आकडेवारी

अमला चा खराब फॉर्म दक्षिण आफ्रिकेसाठी चिंताजनक.

hashim amla practices
Image credit: Cricket South Africa/Instagram

२००४ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये आपला पहिला सामना खेळणारा हाशीम अमला दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोत्तम फलंदाजापैकी आहे. ९००० पेक्षा अधिक धावा नावावर असलेल्या अमलाची सुरवात चाचपडत झाली होती पण पहिल्या २-३ वर्षांनंतर त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी अनेक जबरदस्त खेळया केला आहेत.

Advertisement

पण २०१७ पासून हाशीम अमला खराब फॉर्म मध्ये आहे. २०१७ च्या सुरवातीला त्याची सरासरी ५० च्या जवळ होती पण आता तीच ४७ च्या खाली आली आहे.

Advertisement

२०१७ पासून अमलाने ४८ डावा मध्ये १६१४ धावा काढल्या असून त्याची सरासरी ३५.८६ इतकी कमी आहे. यात ३ शतकांचा आणि १० अर्धशतकांचा समावेश आहे.

यातून बांग्लादेशविरुद्धचे २ सामने वगळले तर अमलाने ४५ इनिंग्स मध्ये १३१७ धावा काढल्या आहेत आणि त्याची सरासरी ३१.३५ इतकी साधारण आहे आणि यात फक्त एका शतकाचा समावेश आहे.
एकेकाळी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीचा भक्कम कणा असलेला अमला आता एक-एक धावेसाठी झुुंजत आहे. यातून तो काय मार्ग काढणार हे पाहण्यासारखे राहील.

Advertisement
Advertisement
Spread the love

Related Articles

Back to top button