वैशिष्ट्ये
आजचा फँटसी प्लेअर: धवन कि गेल?
किंग्स एलव्हेन पंजाब विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स:
Advertisement
पंजाबच्या घरच्या मैदानावर आज दिल्ली कॅपिटल्स आयपीएलचा चौथा सामना खेळतील.पंजाब विरूद्ध मागील ५ सामन्यात दिल्लीला केवळ १ विजय मिळवण्यात यश आले आहे.
Advertisement
दिल्लीचा शिखर धवन सुद्धा आजच्या सामन्याचे आकर्षण असेल. धवनच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष असेल. दिल्लीच्या संघात पंजाबविरूद्ध सर्वाधिक ५४१ धावा धवनच्या नावावर आहेत.
या आयपीएल मध्ये शिखर धवनला चांगला सूर गवसलेला दिसत आहे त्याने मुंबई विरुद्ध ४३ धावा तर चेन्नई विरुद्ध ५१ धावांची चांगली खेळी केली होती. आज तो मोठी खेळी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल यात शंका नाही.
Advertisement
सामन्यात पुन्हा एकदा गेल नावाचे वादळ दिल्ली समोर येऊ शकते.
दिल्ली विरूद्ध पंजाबतर्फे गेलने सर्वाधिक ३८१ धावा केल्या आहेत. तसेच गेल ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सुद्धा पहिल्या ५ फलंदाजांना मध्ये आहे.
Advertisement
Advertisement