आकडेवारी

आयपीएल मध्ये धमाका, केकेआर सारखा

केकेआर साठी ट्रॉफी बरोबर उथपा आणी शाहरुख
सौजन्य: Robin Uthappa/Instagram

आयपीएल ची सुरुवातच कोलकाता नाईट रायडर्स च्या धमाक्या ने झाली होती, खेळलेल्या पहिल्या सामन्यातच त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर वर ब्रेंडन मॅक्युलम च्या तुफानी खेळीच्या जोरावर जबरदस्त विजय मिळवीला होता. केकेआर ने २०१२ आणि २०१४ मध्ये असं दोन वेळा आयपीएल च्या ट्रॉफी वर आपले नाव कोरले आहे अर्थातच, त्यांच्या सर्वात यशस्वी कर्णधार म्हणजे गौतम गंभीर याच्या नेतृत्वाखाली.

Advertisement

केकेआर ने आतापर्यंत आयपीएल मध्ये खूप काही विक्रम आपल्या नावावर नोंदविले आहेत. त्यापैकी पाच खालील प्रमाणे

Advertisement

 

  • केकेआर हा एकमेव संघ आहे ज्याने आयपीएल च्या इतिहासात आपल्या प्रतिस्पर्धी संघाला ५० धावांच्या आत गुंडाळले आहे. केकेआर ने इडन गार्डन वरील जिवंत खेळपट्टीवर आरसीबी संघाला २०१७ मध्ये ४९ धावांवर रोखलं होत, ज्यामध्ये ते १३२ धावांचा पाठलाग करत होते. 
  • केकेआर पहिला संघ ठरला ज्यांच्याकडून एका खेळाडू ने १०० आणि १५० धावा केल्या होत्या. हे त्यांच्या पहिल्या मोसमात मॅक्युलम ने केलेल्या १५८ धावा मुळे घडले.
  • त्याच सामन्यात मॅक्युलम ने ११८ धावा ह्या चौकार व षटकारांच्या जमविल्या होत्या.. चौकार व षटकारानी बनवलेल्या ह्या दुसऱ्या सर्वात जास्त धावा आहेत.
  • सुनील नरीन चा इकोनोमि रेट शॉन पॉलक बरोबर संयुक्तरित्या सर्वात कमी आहे. (गोलंदाज ज्यांनी कमीत कमी २५० चेंडू गोलंदाजी केली आहे)
  • सुनील नरीन ने आयपीएल च्या इतिहासात सर्वात जास्त म्हणजे सात वेळा चार गडी बाद करण्याची कामगिरी केली आहे

Advertisement
Advertisement
Spread the love

Related Articles

Back to top button