मुंबईच्या फलंदाजी क्रमात बदल, हा खेळाडू पुन्हा करणार सलामीला फलंदाजी.
मागील ६ वर्षात मर्यादित षटकांच्या खेळात जगातील सर्वोत्तम सलामीच्या फलंदाजांमध्ये अग्रस्थानी नाव असलेल्या रोहित शर्माने मुंबई इंडियन्सकडून पुन्हा एकदा सलामीला फलंदाजी करणार असल्याचे सांगितले.
मागील काही वर्षात तो मधल्याफळीत फलंदाजीसाठी येत होता. पण या मोसमात तो सलामीला येणार असल्याचे त्याने काल स्वतः सांगितले. त्यामागे असलेल्या काही कारणांपैकी येणारा विश्वचषक हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे. मागील मोसमात रोहितने तिसऱ्या, चौथ्या, आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत १२ सामन्यात २८६ धावा केल्या. तर मुंबईने २०१७ला जिंकलेल्या मोसमातसुद्धा रोहितने मधल्याफळीत फलंदाजीसाठी येत १७ सामन्यात केवळ २३.७८ च्या सरासरीने धावा केल्या होत्या.
रोहित शर्माची आयपीएलमध्ये वेगवेगळ्या क्रमांकावरील सरासरी:-
सलामीला:- ४०.८७
तिसऱ्या क्रमांकावर:- २५.५६
चौथ्या क्रमांकावर:- ३२.७७
पाचव्या क्रमांकावर:- ३३.१२