जयपुरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायजर्स हैदराबादवर सात विकेट्सनी विजय मिळवला. आणि या विजयासह राजस्थानने आपल्या प्लेऑफच्या आशाही कायम ठेवल्या आहेत.
बेअरस्टोच्या अनुपस्थितीत डेविड वार्नरसोबत सलामीला आलेल्या विलीयम्सनला श्रेयस गोपालने डावाच्या चौथ्या षटकातच माघारी धाडले.पहिल्या १० षटकात हैदराबादची धावसंख्या ८४/१ अशी होती.आणि महत्त्वाच म्हणजे त्यात आलेल्या ९ चौकारांपैकी एकही चौकार वार्नरच्या बॅटमधनं आलेला नव्हता.
वार्नरने ३२ चेंडूवर ३७ धावा केल्या त्यात एकाही बाउंड्रीचा समावेश नव्हता.मनिष पांडेने ताबडतोब ६१(३६) धावा करूनही राजस्थानने हैदराबादला १६०/८ (२०) धावांत रोखले.राजस्थानकडुन एरॉन,थाॅमस,गोपाल आणि उनादकटने प्रत्येकी दोन गडी माघारी धाडले.
१६१ धावांच लक्ष्य राजस्थानने तीन विकेट्सच्या मोबदल्यात १९.१ षटकात पुर्ण केले.राजस्थानकडुन अजिंक्य रहाणेने ३९(३४),रहानेसोबत सलामीला आलेल्या लिविंग्सटोनने ४४(२६) तर संजु सॅमसनने ४८(३२) धावा केल्या.