बातम्या

क्वालिफायर २: चेन्नई चा दिल्लीवर विजय, फायनल मध्ये केला प्रवेश

Courtesy: Star India/Twitter

विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई ने दिल्लीचा ५ गडी राखून सहज विजय मिळवला. धोनीने ने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीसंघाकडून सलामीचे फलंदाज पृथ्वी शॉ ५, तर धवन १८ चांगली सुरुवात करून देऊ शकले नाहीत व स्वस्तात माघारी परतले, मुनरो २७ आणि पंत ३८ व तळातल्या फलंदाजाच्या छोट्या योगदानामुळे दिल्ली संघ १४७ असा सन्मानजनक धावसंख्या उभारू शकला.

Advertisement

चेन्नई च्या सलामीच्या फाफ डू प्लेसी ५० व शेन वाटसन ५० ने चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी आपले अर्धशतक पूर्ण केले व चेन्नई चे स्थान आणखी एका फायनल मध्ये निश्चित केले. चेन्नई कडे असलेल्या प्ले ऑफ तसेच फायनल्स खेळण्याचा असणारा अनुभव त्यांना कामी आला. दिल्ली कॅपिटल्स संघाला त्यांच्या मधल्या षटकामध्ये विकेट मिळवून देणारे गोलंदाज रबाडा आणि मॉरिस यांची कमी जाणवली. परंतु दिल्ली कॅपिटल्स संघाने यावर्षी केलेली कामगिरी ही अलौकीकच म्हणावी लागेल.

Advertisement

आता क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागली आहे १२ मे ला होणाऱ्या फायनल ची मध्ये ज्यामध्ये चेन्नई व मुंबई भिडणार आहेत. या वर्षी  तीन वेळेस एकमेकांसमोर आले आहेत व मुंबई ने चेन्नई वर तिन्ही सामन्यात एकतर्फी विजय मिळवला आहे.  पण या वेळेस जो बाजी मारणार त्याला मिळणार या आयपीएल२०१९ च जेतेपद. त्

Advertisement
Advertisement
Spread the love

Related Articles

Back to top button