वैशिष्ट्ये

फँटसी प्लेयर क्वालिफायर १ : चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध मुंबई इंडियन्स

 

Advertisement
Courtesy: IPL/Twitter

आजपासून आयपीएलच्या उपांत्य फेरीचे सामने चालू होणार आहेत आणि पहिलाच सामना आयपीएलच्या इतिहासातील २ सर्वात यशस्वी संघांमध्ये आहे. या दोन्ही संघातील सामन्यांना आयपीएलची एल क्लासिको म्हणून सगळे ओळखतात.
चेन्नईमध्ये सामना असल्याने चेन्नईला घरच्या मैदानावर खेळण्याचा अनुभव जास्त आहे तसेच त्यांची घरच्या मैदानावर कामगिरी सुद्धा सर्वोत्तम आहे पण त्यांना मुंबईनेच फक्त घरच्या मैदानावर पराभूत केले होते हे विसरून चालणार नाही.
चेन्नईकडून धोनी तसेच इम्रान ताहीर जबरदस्त लयीत आहेत पण सर्वांचे लक्ष मुंबईच्या हार्दिक पांड्याकडे असेल. तो आजच्या सामन्याचा हिरो ठरू शकतो. यंदाच्या मोसमात हार्दिकने ४६.६२ च्या सरासरीने १३ डावात ३७३ धावा केल्या आहेत. तसेच त्याचा स्त्राईकरेट तब्बल १९७.३५ आहे. मुंबई कडून फक्त फलंदाजीतच नाही तर गोलंदाजीत सुद्धा त्याने योगदान दिले आहे. त्याचे १४ सामन्यात १४ बळी आहेत.

Advertisement
Advertisement
Spread the love

Related Articles

Back to top button