वैशिष्ट्ये

फँटसी प्लेयर: चेन्नई वि पंजाब, कोलकाता वि मुंबई

Image Credit:KKR/Instagram

आयपीएलच्या साखळी सामन्याचा आज शेवटचा दिवस आहे. अजुन सुद्धा प्ले- ऑफ साठीचा चौथा संघ ठरला नसून आज त्यावर शिक्कामोर्तब होईल.
आजचा पहिला सामना चेन्नई विरूद्ध पंजाब मध्ये होणार आहे. चेन्नई आजचा सामना जिंकून पहिल्या दोन मध्ये आपले स्थान निश्चित करण्याच्या तयारीत असेल तर पंजाब शेवटचा सामना जिंकून शेवट गोड करायचा प्रयत्न करेल.
चेन्नईतर्फे धोनी तर पंजाबकडून गेल आणि राहुलवर सगळ्यांचे लक्ष असेल.
तसेच दुसर्या सामन्यात कोलकाताला प्ले- ऑफला पात्र होण्यासाठी मोठ्या विजयाची आवश्यकता आहे. कोलकाताचा संघ पुन्हा एकदा रसेलकडून वादळी खेळीच्या अपेक्षेने मैदानावर उतरेल. मुंबई विरुद्धच्या मागील सामन्यात रसेलने ४० चेंडूंचा सामना करत तब्बल ८० धावा कुटल्या होत्या.

Advertisement

रसेलने १३ सामन्यात २०५ च्या स्टाईकरेटने ५१० धावा केल्या आहेत. या मोसमात त्याने ६३.७५ च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

Advertisement
Advertisement
Spread the love

Related Articles

Back to top button