वैशिष्ट्ये

फँटसी प्लेयर: दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर वि सन रायजर्स हैदराबाद

Courtesy: IPL/Twitter

स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी राजस्थानला आजचा सामना जिंकणे अत्यावश्यक आहे तर प्ले- ऑफमध्ये पहिल्या २ स्थानामध्ये पात्र ठरण्याचा दिल्लीचा प्रयत्न असेल.

Advertisement

दिल्लीची मदार शिखर धवन आणि श्रेयस अय्यरवर असेल. दोघांनी यावर्षी अनुक्रमे ४७० आणि ४२७ धावा केल्या आहेत. तसेच रहाणेवर सुद्धा सर्वांचे लक्ष असेल. यावर्षी त्याने शतक दिल्ली विरूद्धच केले होते.

Advertisement

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरूद्ध सनराइझर्स हैद्राबाद आयपीएल चा शेवटचा सामना असल्याने सर्वांना विराट कोहलीकडून अपेक्षा असतील. या मोसमात त्याने आणि डिविलियर्स धावा केल्या पण त्यांना कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आले आहे.

आज संघाला विजय मिळवून या मोसमाचा शेवट गोड करण्याचा दोघांचा प्रयत्न असेल. तर आजचा सामना जिंकून प्ले- ऑफच्या शर्यतीत कायम राहायचं हैदराबादचा प्रयत्न असेल.

Advertisement
Advertisement
Spread the love

Related Articles

Back to top button