किंग्स इलेव्हन पंजाब चे आयपीएल२०१९ मधील आव्हान संपुष्टात
किंग्स इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स मध्ये झालेल्या आयपीएल च्या ५२ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स नी किंग्स इलेव्हन पंजाबवर सात गडी राखून सहज विजय मिळवला.
ह्या सामन्यात गेल व केएल राहुल या सलामी जोडीकडून पंजाब संघास खूप आशा होत्या परंतु त्यांनी निराशा केली व पंजाब संघाला मोहाली च्या फलंदाजीस अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर १८३ धावा मध्ये समाधान मानावे लागले त्यामुळे पंजाब संघाचं या आयपीएल मधील आव्हान संपुष्टात आलं.कोलकाता च्या कर्णधार दिनेश कार्तिक ने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला मयंक अगरवाल,निकोलस पुरन, मंदिप सिंग व सॅम कुरण यांच्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाब संघ १८३ धावा जमवू शकला.
प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्स ना सलामीच्या ख्रिस लिन आणि शुभमन गिल ने चांगली सुरुवात करून दिली व अखेरीस दिनेश कार्तिक,रसेल ने केलेल्या फटकेबाजीमुळे २ षटके शिल्लक असताना विजय संपादित केला.
कोलकाता संघाचा पुढील सामना मुंबई विरुद्ध असेल, तर पंजाब संघाची गाठ अंकतालिकेत पहिल्या स्थानावर असलेल्या चेन्नई शी पडणार आहे.