मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा ९ विकेट्सनी धुव्वा उडवत अंकतालीकेत प्रथम स्थानावर उडी घेतली.
Advertisement
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी अचुक मारा केला.हार्दिक पंड्या,बुमराह आणि मलिंगाच्या तिकडीने कोलकात्याच्या सात विकेट्स पटकावत १३३/७ (२०) वर रोखले.राॅबिन उथप्पाने केलेल्या ४०(४७) धावांची खेळी तो विसरण्याचा प्रयत्न करेन.त्यात मॅक्लेनेगनचा खेळलेल्या बेधाव षटकाचाही समावेश आहे.
मुंबई इंडियन्सने १६.१ षटकात लक्ष्य गाठता सहज विजय संपादन केला.मुंबईकडुन रोहित शर्माने अर्धशतक झळकावले(५५*) तर सुर्यकुमार यादवने (४६*) धावा केल्या.
या पराभवानंतर कोलकाता प्लेऑफच्या शर्यतीतून बाद झाला आहे.तर सनरायजर्स हैदराबाद १२ अंकाबरोबर प्लेऑफमध्ये जाणारा पहिला संघ ठरला आहे.
मुंबई इंडियन्स ७ मे (मंगळवार) ला पहिला क्लालीफायर सामना चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध खेळणार आहे.